बलुच बंडखोरांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी जवानांसह ७३ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत पोलीस ठाणे, रेल्वे रूळ आणि राष्ट्रीय महामार्गाला केले लक्ष्य

बलुच बंडखोरांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी जवानांसह ७३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानचा सर्वात अशांत प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानमध्ये बलुच बंडखोरांनी अनेक ठिकाणी हल्ले घडवून आणले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये हे हल्ले अधिक तीव्र झाले असून माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांसह ७३ नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये गेल्या २४ तासांत पोलीस ठाणे, रेल्वे रूळ आणि राष्ट्रीय महामार्गाला वारंवार लक्ष्य करण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांसह एकूण ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला मागच्या काही वर्षांपासून बंडाळीमुळे अशांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे.

एका हल्ल्यात बंदूकधाऱ्यांनी आंतर- प्रांतीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका बसला रोखले. त्यानंतर त्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि ओळख विचारली. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अयुब खोसो यांनी दिली. यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी बहुसंख्य हे दक्षिण पंजाबमधील होते आणि काहीजण खैबर पख्तुनख्वा प्रांतातील होते, त्यामुळे वांशिक कारणारवरूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा अंदाज व्यक्त होत आहे.

तसेच इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्येही काही नागरिकांनी आणि लष्कराच्या जवानांनी आपले प्राण गमावले. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएने या हल्ल्याला ऑपरेशन ‘डार्क विंडी स्टॉर्म’ असं नाव दिलं आहे.

हे ही वाचा:

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची देखरेख करणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटर, स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा

संविधानाला गाजराची पुंगी समजणारे कोण?

‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’

‘प्रचंड वाऱ्यामुळे पुतळा कोसळला’

बलूच लिबरेशन आर्मी हा पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध लढणारा पाकिस्तानमधील सर्वात मोठा बंडखोर गट म्हणून ओळखला जातो. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील नैसर्गिक वायू आणि खनिज संपत्तीची लूट करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शिवाय याचा फायदा स्थानिकांना काहीच होत नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे बलुचिस्तान हा प्रांत गरीब राहिला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बलुचिस्तानमधून चीनला हद्दपार करणे आणि बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणे हे या गटाचे उद्दिष्ट्य आहे.

Exit mobile version