इराणला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. रात्री आलेल्या या भूकंपाने इराण आणि आसपासचा भाग हादरून गेला आहे.वायव्य इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील खोया शहरात शनिवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस आणि जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले. भूकंपात ७ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी मोजली गेली. या भूकंपात सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४४० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खोईशिवाय जवळपासच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार हा भूकंप रात्री ११.४४ वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Notable quake, preliminary info: M 5.9 – 7 km SW of Khowy, Iran https://t.co/Rjmgz05sSM
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) January 28, 2023
इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शेजारच्या पूर्व अझरबैजानची प्रांतीय राजधानी ताब्रिझसह अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले असे इराणच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. खोय हे खोय काउंटीमधील एक शहर आहे आणि इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांताची राजधानी आहे.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार
इराणच्या इस्फहानमधील मध्यवर्ती शहरात रविवारी सकाळी संरक्षण मंत्रालयाच्या दारूगोळा उत्पादन केंद्रांपैकी एका ठिकाणी स्फोट झाला आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की कोणतीही जीवितहानी झाली नाही.