27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियाकेरळचे सात पर्यटक इस्रायलमध्ये बेपत्ता; बेकायदा स्थलांतराचा संशय

केरळचे सात पर्यटक इस्रायलमध्ये बेपत्ता; बेकायदा स्थलांतराचा संशय

३१ भारतीय पर्यटकांची सुटका

Google News Follow

Related

इस्रायलमध्ये सहलीसाठी गेलेल्या केरळच्या पर्यटकांपैकी सात जण तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याने तेथील टूर एजंटने त्या बेपत्ता पर्यटकांच्या बिलांच्या पैशांसाठी ३१ पर्यटकांना अडकवून ठेवले होते. या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अद्याप या बेपत्ता सात पर्यटकांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांची उर्वरित सहल पूर्ण करण्यासाठी ते आता इजिप्तला पोहोचले आहेत.

 

जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर तिरुअनंतपुरममधील पाच पर्यटक आणि कोल्लममधील एका जोडपे बेपत्ता झाले, असे मलप्पूरम येथील ग्रीन ओएसिस टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सीईओ इरफान नौफल याने सांगितले. या सात जणांना बेकायदा स्थलांतर करणाऱ्या टोळीच्या मदतीने नोकरी करायची होती, असा संशय आहे. ‘आम्हाला संशय आहे की त्यांना राज्यातील बेकायदा स्थलांतर करणाऱ्या टोळीची मदत मिळाली आहे. ते पासपोर्टशिवाय बेपत्ता झाले आहेत आणि शुक्रवारपासून त्यांचे फोन बंद आहेत,’ असे नौफल यांनी सांगितले.

 

इस्रायलला पोहोचल्यानंतर केरळमधील पर्यटक बेपत्ता होण्याची ही घटना नवीन नाही. याआधी तिरुअनंतपुरममधील चार नातेवाईक ७ मार्च रोजी अशाच प्रकारे बेपत्ता झाले होते. आम्ही या संदर्भात केरळमधील वरिष्ठांकडे तक्रार केली होती, तरीही यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही, असे नौफल यांनी सांगितले.

 

आता बेपत्ता झालेले सात जण ४७ जणांसह या सहलीवर आले होते. २५ जुलै रोजी ते इस्रायलच्या १० दिवसांच्या दौऱ्यासाठी निघाले होते. तथापि, गटातील नऊ सदस्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास व्हिसा नाकारण्यात आला. ‘बेपत्ता झालेल्या सात सदस्यांपैकी पाच सदस्य ११ सदस्यांच्या गटाचा भाग होते. या सर्वांच्या तिकिटांसाठी एका व्यक्तीने पैसे दिले होते. मात्र या गटातील सहा पर्यटकांचा व्हिसा इस्रायल सीमेवर नाकारण्यात आला. तर, त्यापैकी पाच पर्यटक जे देशात प्रवेश करू शकले, ते फरार झाले आहेत,’ अशी माहिती नौफल यांनी दिली.

 

या ग्रुपची तिकिटे सुलेमान नावाच्या व्यक्तीने दोन व्यक्तींशी संपर्क साधल्यानंतर बुक केली होती, ज्यापैकी एकाने पोलिस असल्याचा दावा केला होता. नौफल यांनी सांगितले की, इस्रायलला जाणाऱ्या लोकांकडून वारंवार बेकायदा स्थलांतर झाल्याची घटना घडली आहे. या घटनांचा गंभीर परिणाम तेथे जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांवर होऊ शकतो, त्यांना येथे सहलीसाठी व्हिसा नाकारला जाऊ शकतो, अशी भीतीही या ट्रॅव्हल एजंटने व्यक्त केली.

हे ही वाचा:

इन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !

आयटीआयमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण’

चांद्रयान- ३ गेले पृथ्वीच्या कक्षेबाहेर

काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

‘काल मला इस्रायलच्या नंबरवरून एका महिलेचा निनावी कॉल आला की हरवलेली व्यक्ती तेल अवीवमध्ये आहे. तसेच, या रॅकेटमागे इक्का नावाच्या व्यक्तीचा सहभाग आहे, असेही तिने सांगितले. मात्र आम्ही अद्याप कॉलची सत्यता तपासू शकलो नाही. परंतु जे बेपत्ता झाले आहेत, ते एका मोठ्या कटाचा भाग आहेत. त्यांनी त्यांचे कपडे सोबत घेतले आहेत. हॉटेलमध्ये सापडलेल्या बॅगा रिकाम्या होत्या. आम्हाला ३१ सदस्यांच्या गटाच्या सुटकेसाठी ट्रॅव्हल एजन्सीला २० हजार डॉलर द्यावे लागले, असेही त्याने सांगितले.

इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सोमवारी ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींचा तपशील मागितला होता. एजन्सीने पोलिस तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तर, सरकारी शिष्टमंडळाचा भाग असलेले कन्नूरचे शेतकरी बिजू कुरियन फेब्रुवारीमध्ये इस्रायलमध्ये बेपत्ता झाले होते, परंतु काही दिवसांनी ते परत आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा