तैवानला ७.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; गेल्या २५ वर्षातील शक्तीशाली भूकंप

देशभरातील वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा बंद

तैवानला ७.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; गेल्या २५ वर्षातील शक्तीशाली भूकंप

तैवानला बुधवार, ३ एप्रिल रोजी जबरदस्त शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. संपूर्ण बेट या भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ इतकी मोजण्यात आली. भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

तैवान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा जबरदस्त भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. तैवानच्या भूकंपामुळे जापानलाही धोका निर्माण झाला आहे. जापानच्या दक्षिणेकडील ओकिनावासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. येथून हवाई उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. समुद्रात ३ मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. यासोबतच फिलीपीन्सला सुद्धा त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीचा भाग रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. देशभरातील बचावकार्य पथकांना सतर्क करण्यात आले आहे.

तैवानमधील भूकंपादरम्यानची अनेक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. काही व्हिडीओमध्ये, या भूकंपानंकर अनेक इमारती कोसळल्या असल्याचे दिसून येत आहे. तसेच पूल आणि रस्त्यांवरील वाहने हालताना दिसत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या २५ वर्षातील तैवानमधील हा शक्तीशाली भूकंप असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष

केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’

कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?

देश पेटविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा देशातून सफाया करा!

तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. फिलीपिन्समध्येही सतर्कतेचा इशारात्सुनामीची शक्यता लक्षात घेऊन फिलीपिन्समध्येही सतर्कतेचा इशारा दिला आहे. फिलीपिन्सच्या भूकंप विज्ञान संस्थेने अनेक प्रांतांच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.

Exit mobile version