30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियाजपानला ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; त्सुनामीचाही इशारा

जपानला ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; त्सुनामीचाही इशारा

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे

Google News Follow

Related

जपानला पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र हादरे बसले आहेत. जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. यानंतर या भागात त्सुनामी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जपानच्या दक्षिणेकडील क्युशू आणि शिकोकू या बेटांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

सुरुवातीला जपानमधील भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली होती. परंतु, नंतरच्या अनुमानात सुधार करून भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले गेले. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेटांना भूकंपाचा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या भूकंपाची खोली ३० किमीपर्यंत पसरल्याचेही हवामान संस्थेने सांगितले आहे. जपान हवामान संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दक्षिणेकडील किनारपट्टीला जवळपास १ मीटरच्या लाटांची त्सुनामी धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यापूर्वी नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी जपानला भूकंपाचा सामना करावा लागला होता. २ जानेवारी रोजी भूंकपाच्या धक्क्यांनी जपानची भूमी हादरली होती. तर त्याचवेळी त्सुनामीचा धोका पण आला होता. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. त्यावेळी जवळपास एक लाख नागरिकांना किनारपट्टीहून सुरळीत स्थळी हलवण्यात आले होते.

हे ही वाचा:

विनेशला हरयाणा सरकारकडून ४ कोटी !

दादर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले !

कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश

बांगलादेशी भारतात घुसत होते, सीमासुरक्षा दलांनी रोखले

भूकंप येण्यामागे भौगोलिक कारणे असून पृथ्वीच्या उदरात सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स आपआपसात घासतात किंवा आपटतात किंवा एकमेकांवर अधिक्रमण करतात तेव्हा जमीन हादरते. याची कंपने जाणवतात यालाच भूंकप म्हणतात. भूंकपाचे मोजमाप रिश्टर स्केलमध्ये करण्यात येते. १ ते ९ अशा पातळीवर हे मोजमाप केले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा