म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

म्यानमारमध्ये हिंसाचार उसळून आला असून म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याक वादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

म्यानमारमध्ये हिंसाचार उसळून आला असून म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याक वादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. काचिन वांशिक अल्पसंख्याक गटाच्या मुख्य राजकीय संघटनेचा वर्धापन दिन सोहळा सुरू होता यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

रविवारी रात्री काचिन वांशिक अल्पसंख्याक गटाच्या मुख्य राजकीय संघटनेचा वर्धापन दिन सोहळा सुरू होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच लष्करी विमानातून चार बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यात ६० लोकं ठार झाली आहेत. तर शंभरहून अधिकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याकांच्या स्वायत्ततेच्या मागण्या अनेक दशकांपासून मान्य करण्यात आल्या नाहीत, त्या दाबून ठेवण्यात आल्या आहेत. या हल्ल्यानंतर म्यानमारमधील वाढत्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री इंडोनेशियामध्ये विशेष बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

हिंदू परंपरा मानणारे आणि त्यांचे पालन करणारे ऋषी सुनक

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

विराटच्या ऑस्ट्रेलियातील तुफान फटकेबाजीमुळे भारतात खरेदी थांबली

पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या

लष्करी किंवा राज्य माध्यमांकडून या हल्ल्यांबद्दल तात्काळपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र, म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, हवाई हल्ल्यामुळे त्यांनी दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे.

Exit mobile version