अफगाणिस्तानमध्ये भूकंपांची मालिका सुरूचं असून अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. यापूर्वी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारची धांदल उडाली आहे. या धक्क्यातून अफगाणिस्तान अद्याप सावरलेला नाही, तोच चार दिवसात अफगाणिस्तानमध्ये आणखी एक भूकंप झाला.
पश्चिम अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. जमिनीखाली १० किलोमीटर खोल या भूकंपाचे केंद्र होते, अशी माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शनिवारी आलेल्या भूंकपात २ हजार ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. तर, मोठी वित्तहानी देखील झाली आहे. यावेळी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीन धक्के बसले होते. या तिन्ही भूकंपांची तीव्रता ६.३, ५.९ आणि ५.९ रिश्टर स्केल इतकी होती.
हे ही वाचा:
पाच हजार घरे जमीनदोस्त; पॅलिस्टिनींची उपासमार
दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!
लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया
तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आलेला भूकंप हा गेल्या दोन दशकांमधील सर्वात मोठा भूकंप आहे. जिंदा जान प्रांतात भूकंपाने १ हजार २०० बळी घेतले आहेत. तर येथील भूकंपात १ हजार ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेक नागरिक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार येथील २० गावांमधील सर्व घरे भुईसपाट झाली आहेत.