जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप; जीवितहानी नाही

इवाते आणि आओमोरी प्रांतात बसले धक्के

जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप; जीवितहानी नाही

जपान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात मंगळवार, २ एप्रिल रोजी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.

जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता. याचे धक्के उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात बसले. तर, जपानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. हवामान खात्याने त्सुनामीबाबत कोणताही इशारा दिला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

यापूर्वी, नवीन वर्षाच्या दिवशी पश्चिम जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक इमारती, वाहने आणि बोटींचेही नुकसान झाले होतो. नागरिकांना घरांपासून दूर राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १ जानेवारी रोजी इशिकावा प्रांत आणि जवळच्या परिसतात भूकंपाचे मोठे हादरे जाणवले होते. यामध्ये ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचाही समावेश होता, त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.

हे ही वाचा:

मुंबई गुटखामुक्त करा, काँग्रेस नेते राजेश शर्मांची मागणी!

तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

“वायनाडमध्ये राहुल गांधी भाजपा विरोधात लढण्याऐवजी ‘इंडी’ आघाडीच्या घटक पक्षाशी लढतायत”

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा सुरू राहणार!

पृथ्वीच्या अंतर्भागात असलेल्या प्लेट्स फिरत असतात आणि त्या एकमेकांवर आदळल्या की भूकंप येतो. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि त्यानंतर भूकंप होतो. जपान आणि आजूबाजूच्या भागात भूकंपाचे धक्के वारंवार मिळत असतात.

Exit mobile version