धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

पाकिस्तानमधील एका रुग्णालयात तब्बल ५०० हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत.

धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

पाकिस्तानमधील एका रुग्णालयात तब्बल ५०० हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. पाकिस्तानच्या मुलतानमधील एका रुग्णालयात ५०० हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. या प्रकरणाची नोंद प्रशासनानं घेतली असून तपास सुरू केला आहे. रुग्णालयात बेवारस स्थितीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

निश्तार वैद्यकीय विद्यापीठाच्या निश्तार रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात मृतदेह उघड्यावर पडलेले दिसत आहेत. अनेक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहेत. तर अनेक मृतदेह रुग्णालयाच्या गच्चीत आढळले आहेत. यातील काही मृतदेहांचे अवयव काढण्यात आले आहेत. ही घटना समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी विभाग अधिकाऱ्याने निश्तार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिलं असून घटनेची नोंद गांभीर्यानं घेण्यात आली आहे. या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड

उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह जाणार?

मोटारीतून प्रवास करणाऱ्यासाठी सिलबेल्ट सक्ती

राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

रुग्णालयात आढळून आलेल्या मृतदेहांचा तपास करून त्याचा चौकशी अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. निश्तार रुग्णालयातील मृतदेह नीट न हाताळल्याप्रकरणाची चौकशी दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागानं सुरू केली आहे. त्यासाठी सहा सदस्यीय टीम देखील तयार करण्यात आली आहे.

Exit mobile version