बांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव

बांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव

१६ डिसेंबर हा दिवस जगाच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत बांगलादेशची मुक्तता केली होती. भारतीय सैन्याच्या या भीम पराक्रमामुळेच पूर्व पाकिस्तान म्हणून पूर्वी ओळखला जाणारा बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर तयार झाले होते.

१६ डिसेंबर १९७१ रोजी ही ऐतिहासिक घटना घडली असून आज या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस विजय दिवस म्हणून ओळखला जात असून या विजय दिनाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी भारत सरकार तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच या युद्धात सहभाग नोंदवलेल्या सैनिकांचा सन्मान सरकारतर्फे करण्यात आला. त्यासाठी एक विशेष कार्यक्रम राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

हे ही वाचा:

अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!

ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी

सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश

तर आज भारताची राजधानी दिल्ली आणि बांगलादेशची राजधानी ढाका या दोन्ही ठिकाणी या विशेष दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम होताना दिसत आहेत. ढाका येथे होत असलेल्या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली येथे कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील नॅशनलवॉर मेमोरियल अर्थात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन १९७१ च्या युद्धात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर त्या आधी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भारतीय सैन्याच्या वीरतेविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

Exit mobile version