पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. दरम्यान, सिंध प्रांतात १० हिंदू कुटुंबियांचे धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धर्मांतराच्या कार्यक्रमाला मंत्र्यांचा मुलगा उपस्थिती असल्याचेही समोर आल्याने यात सरकारचाही पाठींबा असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात १० हिंदू कुटुंबियांचे धर्मांतर करण्यात आले. यावेळी ५० जणांना इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडण्यात आलं. या घटनेनंतर हिंदू कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. धर्मांतर केलेली कुटुंबे सिंधच्या मीरपुरखास क्षेत्रात वास्तव्याला होते आणि त्यांचे एका मदरशात धर्मांतर करण्यात आलं.
मदरशाच्या देखभालीचं काम करणाऱ्या कारी तैमूर राजपूत यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १० हिंदू कुटुंबातील ५० जणांना मदरशात आणण्यात आलं. त्यांनी इस्लाम कबूल केला. यात २३ महिला आणि एक वर्षाच्या लहान मुलीचाही समावेश होता. सिंधमधील सरकारही यामध्ये सहभागी असल्याचे राजपूत यांनी सांगितले.
धार्मिक विषयाचे मंत्री मोहम्मद तल्हा महमूद यांचा मुलगा मोहम्मद शमरोज खान सुद्धा या धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यामुळे या सर्व प्रकाराला सिंध सरकारची मंजुरी होती हे स्पष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची विक्रमी आगाऊ बुकिंग!
पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू
हिंदू कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून नाराजी व्यक्त केली आहे. अशा घटनांविरोधात आवाज उठवणाऱ्या फकीर शिवा कुच्ची यांनी म्हटले की, ‘प्रांतीय सरकारच अशा प्रकारांमध्ये सहभागी आहे. पाकिस्तानातील हिंदू कार्यकर्ते धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून करत आहेत. सिंधमध्ये धर्मांतराची प्रकरण गंभीर असून सरकारने यावर नियंत्रण आणायला हवं. मात्र, मंत्र्याचा मुलगाच अशा कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. त्यामुळे येथील हिंदुंसाठी हा चिंतेचा विषय आहे.