इस्त्रायल- हमास युद्ध थांबविण्यासाठी हॉलीवूड कलाकर मैदानात

५० कलाकारांचे जो बायडन यांना पत्र

इस्त्रायल- हमास युद्ध थांबविण्यासाठी हॉलीवूड कलाकर मैदानात

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या युद्धात अनेक देशांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला उघडपणे पाठींबा दिला असून ते इस्रायलच्या दौऱ्यावरही जाऊन आले आहेत. या युद्धाबद्दल सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, हॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या युद्धाबाबत पत्र लिहिले आहे. बायडन यांनी या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे आता बायडेन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हॉलीवूडमधील तब्बल ५० सेलिब्रेटींनी इस्त्रायल आणि हमास युद्धाबाबत ठामपणे भूमिका घेतली आहे. त्या ५० हॉलीवूडच्या सेलिब्रेटींमध्ये ऑस्कर विजेता जोआक्विन फिनिक्स, जॉन स्टुअर्ड, केट ब्लँचेट, क्रिस्टन स्टुअर्ड, माशिरा अली, सुसान सरडॉन, रिच अहमद या सारख्या कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या पवित्र भूमीवर जे काही होते आहे हे बायडन यांना कळाले असेलच. याबाबत त्यांनी अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. जो काही हिंसाचार सुरु आहे त्याला आटोक्यात कसे आणता येईल आणि सलोखा कसा होईल याचा विचार करण्याची गरज आहे. गाझापट्टीमध्ये जे सुरु आहे त्यावरुन आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत याचे भान संबंधित देशांना करुन द्यावे. त्यात बायडन यांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी मांडले आहे.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

मॅनहोल साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाखांची भरपाई द्या!

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

कंत्राटी भरतीने नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला!

सध्या त्यांच्या या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत, स्वरा भास्कर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Exit mobile version