पाकिस्तानातील पेशावरच्या क्वेट्टा येथे बॉम्बस्फोट झाला आहे. मुसा चौकात क्वेट्टा स्टेडियमजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बॉम्बस्फोटानंतर घबराटीचे वातावरण पसरले आहे. स्फोट झाला त्यावेळी क्वेट्टा स्टेडियममध्ये बाबर आझम आणि सरफराज अहमद यांच्या संघांमध्ये सामना सुरू होता. हा सामना पाकिस्तान सुपर लीगचा एक प्रदर्शनीय सामना होता. सामना सुरू असताना बॉम्बस्फोट झाला. स्फोटानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला होता.
पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रदर्शनीय सामना खेळवला जात होता. क्वेट्टा येथील बुगाटी स्टेडियमवर सर्फराज अहमदचा क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि बाबर आझमचा पेशावर झल्मी यांच्यात सामना खेळला जात होता. त्यानंतर अचानक बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर तो थांबवावा लागला.काही दिवसांपूर्वीच पोलीस लाईन भागात आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात अनेकजण जखमी झाले होते. हा स्फोट पुन्हा त्याच भागात झाला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप
श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात
पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद
आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला
या सामन्यासाठी १३,००० पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली होती. सामना बघण्यासाठी मोठी गर्दी स्टेडीयममध्ये झाली होती. चार हजारपेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले होते. हा सामना पाहण्यासाठी शाहिद आफ्रिदी, मोईन खान आणि जावेद मियांदाद देखील क्वेटा येथे पोहोचले होते. याशिवाय अनेक पाकिस्तानी स्टार्सही स्टेडियममध्ये उपस्थित होते.मात्र, स्फोटामुळे खेळाडूंना कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने रविवारी एका निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते.