प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण

प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेड आणि समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाच मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना बोलावण्याची योजना केंद्र सरकार योजत आहे. त्यापैकी तीन देश हे अफगाणिस्तानला लागून आहेत.

राजनैतिक माध्यमांद्वारे अनौपचारिक संपर्क आधीच केला गेला आहे आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढील आठवड्याच्या शेवटी डिसेंबर १८-१९ मध्ये या पाच देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

हा संपर्क नेत्यांच्या पातळीवर शिखर परिषदेची पायाभरणी करेल. असेही सूत्रांनी सांगितले. जर योजना कार्यान्वित झाल्या आणि कोविड परिस्थितीने परवानगी दिली तर, पाच देशांचे राष्ट्रपती हे जानेवारीत दिल्लीला येतील. कझाकस्तानचे कॅसिम-जोमार्ट तोकायेव, उझबेकिस्तानचे शवकत मिर्जिओयेव, ताजिकिस्तानचे इमोमाली रहमोन, तुर्कमेनिस्तानचे गुरबांगुली बर्दिमुहामेडो आणि किर्गिझस्तानचे सदीर जापारोव या नेत्यांचा यामध्ये समावेश असेल. तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे.

यापूर्वी, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या BIMSTEC गटातील देशांना आमंत्रित करण्यासाठी योजना आखल्या जात होत्या. परंतु ते प्रत्यक्षात आले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा:

नाफ्ताली बेनेट यांचा ऐतिहासिक युएई दौरा

मी शो पीस बनणार नाही

येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही

ठेवीदारांचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित

पाच मध्य आशियाई देश तालिबान शासित अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी महत्त्वाचे आहेत आणि दिल्ली गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याशी संलग्न आहे. अलीकडेच, NSA अजित डोवाल यांनी आयोजित केलेल्या अफगाणिस्तानवरील प्रादेशिक सुरक्षा संवादासाठी पाच देशांचे NSA दिल्लीत आले होते. या सर्वांनी अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.

Exit mobile version