भूकंपाने हादरला कांगारूंचा देश

भूकंपाने हादरला कांगारूंचा देश

कांगारूंचा देश अशी ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाला भूकंपाच्या झटक्याने हादरवून सोडले आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजायच्या सुमारास हे भूकंपाचे झटके जाणवू लागले. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात भूकंपाचे केंद्र होते.

मेलबर्न शहरापासून अंदाजे दोनशे किलोमीटर ईशान्येला मॅन्सफील्ड मधील एका गावात भूकंपाचे केंद्र असल्याचे समजले. अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वेनुसार या भूकंपाची तीव्रता ५.८ रिस्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले पण नंतर ही तीव्रता ५.९ रिस्टर स्केल असल्याचे सांगितले गेले. तर या भूकंपाची खोली ही दहा किलोमीटर इतकी होती.

हे ही वाचा:

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा

या भूकंपामुळे नागरिकांमध्ये खूपच भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी अनेक नागरिक घाबरून गेले. ऑस्ट्रेलियात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके अनुभवल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या भूकंपाचे केंद्र जर मुख्य मेलबर्न शहरात असते तर खूप मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होऊ शकली असती असे तज्ञ वर्तवत आहेत. दरम्यान अजून तरी या भूकंपाने कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही.

Exit mobile version