इजिप्तमध्ये एका चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. इजिप्तमधल्या कॉप्टिक चर्चमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
इजिप्तमधल्या कॉप्टिक चर्चमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रविवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी बैठक सुरू असताना ही आग लागली. त्यानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. दरम्यान या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १५ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.
Egypt's Coptic Church, citing health officials, says fire at Cairo church kills at least 41 people, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2022
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंकडे नगरविकास तर फडणवीसांकडे अर्थ व गृह
स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
दरम्यान अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कॉप्टिक ख्रिश्चन पोप तावाड्रोस II यांच्याशी फोनवर बोलून घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.