४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली

जागतिक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायनन्सच्या सहकार्याने ईडीची मोठी कारवाई

४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली

अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने जागतिक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायनन्सच्या सहकार्याने चिनी नागरिकांशी संबंधित ४०० कोटी रुपयांचा ऑनलाइन गेमिंग घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी फिविन गेमिंग ऍपद्वारे पैशांची उलाढाल केल्याचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ईडीने या घोटाळ्याशी संबंधित क्रिप्टो करन्सी होल्डिंगसह मालमत्ताही जप्त केल्या आहेत, ‘द फ्री प्रेस जर्नल’ने या संदर्भात माहिती दिली आहे.

ईडीच्या तपासानुसार, चिनी नागरिकांनी काही भारतीय साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीर बेटिंग आणि गेमिंग ऍप्लिकेशन फिविन चालवले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेले अरुण साहू, आलोक साहू, चेतन प्रकाश आणि जोसेफ स्टॅलिन हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बायनन्स कंपनीच्या अंतर्गत असलेल्या गुप्तचर युनिटने ईडीला फिविन घोटाळा उघड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हे ही वाचा:

न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

अंधेरीत महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू

उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!

जम्मू-काश्मीरचा दुसरा टप्पा पूर्ण, सरासरी ५४ टक्के मतदान!

या गेमिंग प्लॅटफॉर्मने त्याच्या वापरकर्त्यांकडून अंदाजे ४७.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४०० कोटींची लुट केल्याचे उघड झाले आहे. मिनी गेम्सद्वारे जलद परतावा देण्याचे आश्वासन दिले परंतु वापरकर्त्याच्या खात्यांमध्ये भरीव निधी जमा झाल्यानंतर पैसे काढण्यास मनाई करण्यात आली. शिवाय जलद आणि सुलभ पैसे कमावणारे ऍप म्हणून फिविनची जाहिरात करण्यात आली होती. युट्युब, फेसबुक आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रचार करण्यात आला. ईडीला पीएमएलए अंतर्गत तपासात आढळून आले आहे की, चीनी नागरिक भारतीय नागरिकांच्या मदतीने हे ऍप चालवत आहेत. ओरिसा येथील रहिवासी असलेल्या अरुण साहू आणि आलोक साहू यांनी रिचार्ज करण्यासाठी कमिशन दिले होते. हे ऍपद्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केलेले पैसे क्रिप्टोमध्ये बदलले होते. ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की यातून सुमारे ४०० कोटी रुपये लुटले गेले आणि ते चिनी नागरिकांशी जोडलेल्या सात बायनन्स वॉलेट्समध्ये हलवले गेले.

हे ही वाचा:

न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

अंधेरीत महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू

उमराह व्हिसाच्या नावाखाली भिकाऱ्यांना पाठवणे थांबवा, सौदी अरेबियाचा पाकिस्तानला इशारा!

जम्मू-काश्मीरचा दुसरा टप्पा पूर्ण, सरासरी ५४ टक्के मतदान!

यावर कारवाई करत ईडीने सुमारे २५ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. तर, चिनी नागरिकांची क्रिप्टो खातीही गोठवण्यात आली आहेत. या गेमिंग ऍपद्वारे भारतातून चीनमध्ये ४०० कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने या गेमिंग ऍपच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

जरांगेंनी विश्वासार्हता गमावलीय काय? | Mahesh Vichare | Manoj Jarange Patil | Andolan |

Exit mobile version