बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये एका कंटेनर डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शनिवार, ४ जून रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चटगावमधील सीताकुंडा उपजिल्ह्यातील कदमरसूल परिसरात काल रात्री ही घटना घडली. एका बीएम कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागली आणि या आगीत होरपळून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. कंटेनर डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर काही स्फोट झाले. मृतांमध्ये काही अग्निशमन दलाच्या जवानांचा देखील समावेश आहे.

बांगलादेश अग्निशमन सेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर डेपोमध्ये घडलेल्या या घटनेदरम्यान त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घाटनेमधील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आग विझवण्यासाठी सुमारे १९ अग्निशमन दल काम करत असून सहा रुग्णवाहिकाही घटनास्थळी उपस्थित आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”

“काश्मिरी पंडितांची चिंता करणाऱ्यांच्या राज्यातल्या हिंदूंचं काय?”

…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा

ही आग रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तसेच रात्री साधारण ९ वाजता ही आग लागली होती. त्यानंतर येथे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली असं सांगण्यात येतंय. या घटनेची नंतर सखोल चौकशी केली जाणार आहे.

Exit mobile version