भारतात ऑगस्टपासून दरमहिना तयार होणार ४ कोटी स्पुतनिक डोस

भारतात ऑगस्टपासून दरमहिना तयार होणार ४ कोटी स्पुतनिक डोस

भारत स्पुतनिक व्ही (कोविड –१९) या रशियातील लसीचे उत्पादन ऑगस्टमध्ये सुरू करणार असल्याची माहिती रशियामधील भारतीय राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांनी शनिवारी दिली. आता या दोन देशांच्या संयुक्त प्रकल्पातून आपल्या देशामध्ये लसीचे दरमहिना ३.५ ते ४ कोटी डोस तयार होऊ शकणार आहेत. हे उत्पादन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होईल. ही खरोखरच देशासाठी दिलासा देणारी घटना आहे.
रशियाकडून भारताला जवळपास १ कोटी ८० लाख डोस दिले जाणार आहेत. त्यातील ३० लाख डोस मे महिन्यांत, ५० लाख डोस जूनमध्ये तर १ कोटी जुलैमध्ये दिले जाणार आहेत. त्यानंतर या लसीच्या उत्पादनाचे तंत्र भारतात हस्तांतरित केले जाईल आणि ऑगस्टपासून भारतात ही स्पुतनिक लस तयार होऊ शकेल.

हे ही वाचा:
कोरोनाविरुद्ध नव्हे, मोदींविरुद्ध लढणारा मुख्यमंत्री!

भारताला ब्रिटनकडून १८ टनांची वैद्यकीय मदत

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

ठाकरे सरकारमध्ये पुन्हा धुसपूस…हे आहे कारण

लसीचे उत्पादन टप्प्याटप्प्याने होणार असून भारतात तीन टप्प्यांत ही लस उत्पादित केली जाईल. लसीकरता लागणाऱ्या सामग्रीचा रशियाकडून पुरवठा सुरु झालेला आहे. मुख्य म्हणजे रेड्डीज लॅबोरेटरी आणि रशियाच्या थेट गुंतवणूक निधीच्या माध्यमातून ८५ कोटी डोस भारतात तयार होऊ शकतील.

यावेळी त्यांनी स्पुतनिक लाईट लसीवरही चर्चा केली आणि ते म्हणाले, भारतात ही लस मंजूर होईल अशी आशा आहे.
रशियाने देखील स्पुतनिक लाईटचा प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे. हा केवळ एकच डोस असेल. दुसरा डोस घेण्याची गरज नाही. भारतात त्याच्या नियमनाची मान्यता अद्याप मिळालेली नाही. पण एकदा या मान्यता मिळाल्या की स्पुतनिक लाईटच्या माध्यमातून भारत आणि रशिया यांच्यातील आणखी एक सहकार्य करार अस्तित्वात येऊ शकेल.
जगातील ६० पेक्षा अधिक देशांमध्ये स्पुतनिक व्ही लस मंजूर झाली आहे. गेल्या १२ आठवड्यात डॉ. रेड्डीज लॅबने हैदराबादमध्ये मर्यादित स्वरूपात पायलट सॉफ्ट लाँचिंग सुरू केली आहे. सध्या लसची किंमत प्रति डोस ९९५ रुपये इतकी आहे. तथापि, उत्पादन सुरू झाल्यावर ते नक्की खाली येईल अशी अपेक्षा आहे.

कोरोनाविरूद्ध लढण्याच्या भारताच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविशिल्ड आणि देशी कोवॅक्सिन या दोन लसी आहेत. रशियाकडून ज्या ३० लाख लशी येणार आहेत, त्यापैकी आतापर्यंत आपल्याला २ लाख १० हजार डोस वेगवेगळ्या टप्प्यांत पुरविल्या आहेत.

Exit mobile version