आखाती देश कुवेतमधील दक्षिणेकडील मंगफ शहरातील एका इमारतीला आग लागली आहे.या दुर्घटनेत सुमारे ४० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हुन अधिकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, बुधवारी (१२ जून) सकाळी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीतमध्ये घर बांधकाम करणारे कामगार राहत होते.या दुर्घटनेत ४० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर ३० हुन अधिक जखमी झाले आहेत.मृतांमध्ये बरेचजण केरळचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
रशिया- युक्रेन युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू
पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या गुंड जयेश पुजाऱ्याला कोर्टात चोपलं!
चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्रच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, मोदींनी मारली मिठी!
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत होणार ‘एनएसजी हब’!
या इमारतीत १६० लोक राहत असल्याची माहिती आहे.तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.दरम्यान, आग इतकी भीषण होती की अनेकांनी घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.