अंदमान-निकोबर भूकंपाने हादरले

अंदमान-निकोबर भूकंपाने हादरले

अंदमानमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी रात्री १२.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचा केंद्रबिंदू अंदमान समुद्रात होता. भूकंपाची खोली ७७ किमी होती.

यापूर्वीही अंदमान निकोबार बेटांवर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. अंदमान आणि निकोबार बेटांच्या २५३ किमी अंतरावर असलेल्या पोर्ट ब्लेअर येथे १० नोव्हेंबर रोजी पहाटे २.२९वाजता ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती. मात्र या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

अंदमान निकोबार बेटांवर ३ सप्टेंबर रोजी भूकंपाचे धक्के पहिल्यांदा जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ मोजण्यात आली. यापूर्वी २ सप्टेंबर रोजीही भूकंपाचे धक्के जाणवले होते. यादरम्यान भूकंपाची तीव्रता ४.९ इतकी मोजण्यात आली. यापूर्वी २४जानेवारी रोजी, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते जे कमीतकमी १५ सेकंदांपर्यंत चालले होते . त्यामुळे लोक घाबरून लोक त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भूकंप 
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सोमवारी सकाळी ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सकाळी ६.३८ वाजता ४.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला आणि त्याचा केंद्रबिंदू कच्छमधील दुधई गावापासून ११ किमी उत्तर-ईशान्येस होता.

Exit mobile version