हिंदी महासागरात चीनचे जहाज बुडून ३९ जण बेपत्ता

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे बचावकार्याचे आदेश

हिंदी महासागरात चीनचे जहाज बुडून ३९ जण बेपत्ता

हिंदी महासागरात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चीनची एक बोट महासागरात बुडाल्याचे वृत्त समोर आले आहे. मासेमारी करणारी बोट महासागरात बुडून तब्बल ३९ जण बेपत्ता असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

चिनी मासेमारी ‘लू पेंग युआन यू ०२८’ हे जहाज हिंदी महासागरात बुडाले आहे. या बोटीवर सात चिनी क्रू मेंबर्स, १७ इंडोनेशियन आणि पाच फिलिपिनो नागरिक उपस्थित होते. या दुर्घटनेनंतर ३९ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी चीनचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय, चीनचे वाहतूक मंत्रालय आणि शेडोंग प्रांताला परिस्थितीची तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. शी जिनपिंग यांनी आंतरराष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव पथकांचीही मदत घेतली आहे.

हे ही वाचा:

१२ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ १५० कोटींच्या कल्बमध्ये सामील!

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आसामच्या वादग्रस्त ‘लेडी सिंघम’चा अपघाती मृत्यू

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांच्या बचाव पथकानेही शोध मोहीम सुरु केली आहे. अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही. तसेच ही बोट कशामुळे बुडाली हे ही स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version