भारतात आलेले ३९ परदेशी प्रवासी पॉझिटिव्ह

सर्व विमानतळांवर परदेशातून प्रवाशांची रँडम टेस्ट

भारतात आलेले ३९ परदेशी प्रवासी पॉझिटिव्ह

Coronavirus testing expands for asymptomatic use.

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारही याबाबत सावध आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम टेस्ट सुरू करण्यात आली आहे. रँडम टेस्ट दरम्यानही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.भारतात आतापर्यंत ३९ परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत,.

एका अहवालानुसार, २४ डिसेंबरपासून आतापर्यंत ४९८आंतरराष्ट्रीय विमानांच्या प्रवाशांची चाचणी घेण्यात आली आहे. या दरम्यान १,७८० नमुने घेण्यात आले आहेत. यापैकी ३९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता हे सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.बंगळुरू विमानतळावर ४ प्रवाशांना संसर्ग झाल्याचे आढळलेकाल म्हणजेच मंगळवारी कर्नाटकातील बेंगळुरू येथील केम्पेगौडा विमानतळावर चार परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाचा सामना करण्याच्या तयारीसाठी मंगळवारी देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.मॉक ड्रिल आम्हाला कोणत्या स्तरावर उणीव आहे हे कळण्यास मदत करेल आणि आम्ही वेळेत त्या दुरुस्त करू असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

भारतात कोरोनाचे १५७ नवीन रुग्ण आढळले
मंगळवारी देशात एकूण १५७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणे ३,४४१ वर आली आहेत. एका दिवसापूर्वी सक्रिय प्रकरणे ३४२८ होती. यासह, एकूण संक्रमणांपैकी ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. त्याचवेळी, याआधी बिहारच्या बोधगयामध्ये ५ भाविकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. प्रत्यक्षात विमानतळावर ३३ परदेशी नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले, तर उर्वरित २८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Exit mobile version