बलुचिस्तानमधील मशिदीजवळ झालेल्या स्फोटात १३ ठार

३० हून अधिक लोक जखमी

बलुचिस्तानमधील मशिदीजवळ झालेल्या स्फोटात १३ ठार

पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात १३ जण ठार झाले असून ३० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटात ठार झालेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांचाही समावेश आहे.  एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ईद मिलादुन नबी निमित्त लोक जमत होते आणि तेव्हा मशिदीजवळ हा स्फोट झाला.

पाकिस्तान मीडिया हाऊस ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ईद मिलादुन नबी उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येत होती. त्यावेळी मोठी गर्दी जमली होती. या मिरवणुकीदरम्यान हा भीषण स्फोट झाला. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला. येथे प्रेषित मोहम्मदच्या जयंतीनिमित्त लोक जमले होते. मस्तुंगचे सहाय्यक आयुक्त अत्ता उल मुनीम यांनी हा स्फोट भयंकर असल्याचे म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मस्तुंगचे डीएसपी नवाज गशकोरी यांचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

१२ वर्षीय बलात्कार पीडितेच्या वडिलांना फोटोवरून पटली ओळख!

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) नेता हाफिज हमदुल्लासह किमान ११ जण स्फोटात जखमी झाले होते. आठवड्यापूर्वी, एका लेव्ही अधिकाऱ्यावर अज्ञात लोकांनी बसस्थानकावर गोळीबार केला होता, तर तेथून जाणारे दोघे जखमी झाले होते.

Exit mobile version