शुक्रवारी (16 ऑगस्ट) त्रिपुरातील आगरतळा रेल्वे स्थानकावर 3 रोहिंग्या मुस्लिमांना अटक करण्यात आली. सरकारी रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 2 महिला आणि 1 पुरुष रोहिंग्या मुस्लिम अवैध घुसखोरी करून भारतात स्थलांतरित होण्याच्या प्रयत्नात होते. या तिघांनीही बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही घुसखोर प्रत्यक्षात म्यानमारचे नागरिक आहेत.
त्रिपुरा सरकारी रेल्वे पोलिसांनी अहवाल दिला आहे की गेल्या तीन महिन्यांत 250 हून अधिक बांगलादेशी मुस्लिम आणि 35 रोहिंग्या मुस्लिमांना सीमा सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी घुसखोरी करताना पकडले आहे. दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी रवी गांधी म्हणाले की, बीएसएफ देशाची सेवा आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.
तिन्ही घुसखोरांचे वय 19 ते 27 या दरम्यान आहे. तसेच, आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने भारतातील प्रमुख शहरांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. लक्षात घेण्याची बाबा अशी की, 2017 पासून बांगलादेशातील कॉक्स बाजार परिसरात 10 लाखांहून अधिक विस्थापित रोहिंग्या मुस्लिम राहत आहेत. आपली आर्थिक स्थिती बदलण्यासाठी रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशच्या निर्वासित छावण्यांमधून भारतात येण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. सोबतच भारतात बसून दलाल आणि नातेवाईकांच्या मदतीने आवश्यक कागदपत्रे तयार केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
हे ही वाचा:
लव्ह जिहाद प्रकरणावरून उल्हासनगरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !
राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!
बांगलादेशातून सातत्याने होणारी घुसखोरी आणि राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे एडीजी रवी गांधी यांनी गुवाहाटीच्या सीमावर्ती भागाला भेट दिली. या बैठकीदरम्यान, एडीजी रवी गांधी यांनी वर्चस्व असलेल्या क्षेत्राचे मूल्यांकनासोबत भविष्यात सीमावर्ती भागातील संभाव्य आव्हानांचेही मूल्यांकन केले आहे.
भारत-बांगलादेश सीमेवरील सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने (MHA) स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून रवी गांधी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी अधिका-यांसमवेत बैठकीत सीमेवरील प्रचलित सुरक्षा परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला, विशेषत: कोणत्याही प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी आणि सीमावर्ती भागाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सीमेपलीकडील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या धोरणांवर चर्चा घेतल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा:
कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !
मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!