आणखी तीन राफेल भारतात दाखल

आणखी तीन राफेल भारतात दाखल

भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवणारी तीन नवी राफेल विमाने भारतात दाखल झाली आहेत. फ्रान्सहून भारतासाठी उड्डाण केलेली ही तीन विमाने बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी भारतात पोहोचली आहेत. सुमारे सात हजार किलोमीटरचा पल्ला कुठेही न थांबता पार करून ही विमाने भारतात दाखल झाली. यासाठी त्यांच्यात हवेतल्या हवेतच इंधन भरले गेले.

याबाबत ट्वीट करताना हवेतल्या हवेत इंधन भरायला मदत करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाचे भारतीय हवाई हवाई दलाने आभार व्यक्त केले आहेत.

हे ही वाचा: आकाशात हिंदुस्थानची सत्ता प्रस्थापित करणारे अस्त्रभारतीय हवाईदलाच्या भात्यात नवे स्वदेशी शस्त्र

ही विमाने भारतीय हवाई दलात सामिल झालेली राफेल विमानांची तिसरी खेप आहे. भारतीय हवाई दलाने एकूण ३६ विमानांची मागणी ₹५९ हजार कोटी खर्चून केली आहे. फ्रान्सकडे ही विमाने सप्टेंबर २०१६ मध्येच मागितली होती. ही तीन विमाने पोहोचल्याने भारताकडे एकूण अकरा राफेल विमाने झाली आहेत.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जामनगर तळावर आणखी तीन राफेल विमाने दाखल झाली. पहिल्या पाच राफेल विमानांचे २९ जुलै रोजी भारतीय हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर आगमन झाले होते. लवकरच त्यांना भारतीय हवाई दलात सामिल करून घेतले गेले. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रेंच संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख मार्शल आर के एस भदौरिया उपस्थित होते.

Exit mobile version