तुर्की – सिरिया नंतर आता भारतातही वेगवेळ्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शुक्रवारी पहाटे ५ वाजता जम्मू- काश्मीरमधील कटरा भाग भूकंपाने हादरला.भूकंपाच्या झटक्यानेच लोकांची झोप उघडली.जम्मू- काश्मीरपासून पूर्वेला ९७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्र बिंदू होता., या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ मोजल्या गेली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे ५.०१ वाजता रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली १० किमी इतकी नोंदवण्यात आली आहे.
गुरुवारी देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. आदल्या दिवशी मेघालयात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ९.२६ वाजता भूकंप झाला आणि त्याची तीव्रता ३.९ इतकी नोंदवण्यात आली. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
शिलाँग, पूर्व खासी हिल्स जिल्हा मुख्यालय, रि-भोई आणि आसाममधील कामरूप महानगर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे तात्काळ जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गेल्या रविवारी आणि सोमवारी, मध्य आसाममधील होजई जवळ त्यांचे केंद्रबिंदू असलेले अनुक्रमे ४ आणि ३.२ तीव्रतेचे दोन भूकंप नोंदवले गेले. ईशान्य प्रदेश हा उच्च भूकंपाच्या क्षेत्रात येतो, जिथे भूकंपाचे धक्के अनेकदा जाणवतात.
हे ही वाचा:
महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा
शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव
सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका
इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या
तुर्की, फिलिपाइन्स, सीरिया, नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता बघून दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय राजधानीत भूकंपाच्या तयारीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्येकजण आपल्या जीवाच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहे