मध्य पूर्व आशियात बनत आहे दुसरी क्वाड

मध्य पूर्व आशियात बनत आहे दुसरी क्वाड

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका, इस्रायल आणि यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत पहिली बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी मध्य-पूर्व आणि पूर्व आशियामध्ये आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांसह, व्यापार आणि सागरी सुरक्षा वाढवण्यावर चर्चा केली.

जयशंकर सध्या इस्रायलच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासोबत सोमवारी व्हर्चुअल बैठकीच्या वेळी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री याईर लापिद उपस्थित होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि युएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.

“आर्थिक वृद्धी आणि जागतिक समस्यांवर अधिक जवळून काम करण्यावर चर्चा केली.” असं जयशंकर म्हणाले.

जयशंकर यांनी आपल्या संक्षिप्त टिप्पणीमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही तीनही देश भारताच्या सर्वात जवळचे नाही तरी, जवळच्या संबंधांपैकी आहात.”

त्यांनी अँटनी ब्लिन्कन यांच्याशी सहमती दर्शवली की या प्रकारचे मंच तीन वेगवेगळ्या द्विपक्षीय गुंतवणूकींपेक्षा अधिक चांगले काम करू शकते.

“मला वाटते की हे स्पष्ट आहे की आपण मोठ्या समस्यांवर आपण सर्वजण सारखेच विचार करतो. काही व्यावहारिक गोष्टींवर काम करण्यासाठी सहमत होऊ शकलो तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल.”

हे ही वाचा:

‘स्क्विड गेम’मुळे का झाले पाकिस्तानी नाराज?

एलएसीवरील सैनिक शिकणार ‘तिबेटोलॉजि’

देवभूमीत पुन्हा ढगफुटीने हाहाःकार

‘शिवतीर्थावरील इटलीचे दिवे हा योगायोग, की लांगुलचालन?’

अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सचिव ब्लिन्केन आणि त्यांच्या तीन समकक्षांनी मध्य पूर्व आणि आशियामध्ये व्यापार, हवामान बदलाशी लढणे, ऊर्जा सहकार्य आणि सागरी सुरक्षा वाढवणे यासह आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

Exit mobile version