सौदी अरबमध्ये हज यात्रेकरुंची बस आगीच्या भक्ष्यस्थानी,२० प्रवाशांचा मृत्यू

मक्का शहराकडे भाविकांना घेऊन जाणारी बस पुलावर आदळली

सौदी अरबमध्ये हज यात्रेकरुंची बस आगीच्या भक्ष्यस्थानी,२० प्रवाशांचा मृत्यू

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमझान महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाईट बातमी समोर आली आहे. हज भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दोन डझनपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मक्का मदिना मुस्लिम धर्मातील अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी येथे लाखो लोक येतात. रमझान महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाखो लोक येथे येऊ लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी येमेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य असीर प्रांतात मक्का शहराकडे भाविकांना घेऊन जाणारी बस पुलावर आदळली.  बसने टक्कर मारल्यानंतर बसला मोठी आग लागली.

ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. पुलावर आदळल्यानंतर बस उलटली आणि आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत २० लोकांचा मृत्यू झाला. बस अपघातात किमान २९ लोक जखमी झाले.  लोक जखमी झाले आहेत. या बसमधून वेगवेगळ्या देशातून आलेले प्रवासी प्रवास करत होते. आपत्कालीन सेवा तातडीने अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आणि जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे

आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू

विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

सौदी अरेबियाच्या पवित्र स्थळांच्या ठिकाणी यात्रेकरूंची वाहतूक करणे हे एक धोकादायक काम आहे, विशेषत: हज यात्रेच्या काळात प्रवास करणे धोक्याचे असते. . ऑक्टोबर २०१९ मध्ये देखील मदिना येथे एका बसची दुसर्‍या वाहनाला धडक बसून मोठा अपघात झाला होता. ज्यामध्ये सुमारे ३५ परदेशी लोक ठार झाले आणि चार जण जखमी झाले.

Exit mobile version