कुपवाडा जिल्ह्याच्या जुमागुंड गावात सुरक्षा दलांनी गुरुवारी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. जानेवारी महिन्यापासून २६ अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी ठार मारले आहे. हे तिन्ही अतिरेकी पाकिस्तानच्या लष्कर ए तैयबाचे अतिरेकी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
काश्मीर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे की, ज्या तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे ते पाकिस्तानी असून त्यांचा लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आम्ही २६ अतिरेक्यांना ठार मारले आहे. त्यात १४ जैश ए मोहम्मद आणि १२ लष्करचे अतिरेकी आहेत.
जुमागुंड गावात अतिरेकी शिरल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. कुपवाडा पोलिसांमार्फत आमच्याकडे ही माहिती आल्यावर कारवाई करण्यात आली. त्यात या तीन अतिरेक्यांना मारण्यात आले.
जेव्हा सुरक्षा दलाचे अधिकारी जुमागुंड गावात पोहोचले तिथे हे अतिरेकी लपलेले होते. त्यानंतर अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार केला. त्यातून दोन्ही बाजूंनी चकमक झडली.
हे ही वाचा:
पाकिस्तानात होणार श्रीलंकेसारखी परिस्थिती
भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते
ही तर रिसॉर्टमधील सांडपाण्यावरून ईडीने केलेली चौकशी!
मागे काश्मीरी पंडितांवर वाढत्या हल्ल्यामुळे काश्मिरी पंडितांमध्ये नाराजी होती. त्यांनी निदर्शने केली होती. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी असा दावा केला आहे की, २०२२मध्ये आतापर्यंत ५० चकमकी झाल्या ज्यात ८३ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या अतिरेक्यांबाबत जे गुप्तचर विभागाचे अलर्ट मिळतात त्यावरून या कारवाया होत आहेत. या वर्षभरात ११५ लोक मृत्युमुखी पडले असून त्यात १६ सर्वसामान्य नागरीक आहेत. १६ सुरक्षा दलाचे अधिकारीही आहेत. ४० अतिरेक्यांना अटकही करण्यात आली आहे.