अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानचा पश्चिम प्रांत सोमवारी १७ जानेवारी रोजी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बदघीस प्रांतात सोमवारी दुपारी भूकंपाचे दोन धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यांनी तुर्कमेनिस्तानला लागून असलेला सीमावर्ती भाग हादरला. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भूकंपग्रस्त गावांमध्ये अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बदघीसमध्ये झालेल्या भूकंपात मोठी वित्तहानी झाली आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास ५.३ रिश्टर स्केलचा पहिला भूकंपाचा धक्का बसला, तर ४.९ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप दुपारी चारच्या सुमारास जाणवला. यामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार २६ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रांताच्या संस्कृती आणि माहिती विभागाचे प्रमुख बास मोहम्मद सरवरी यांनी सांगितलं की, भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात अनेक घरे कोसळली आहेत.

हे ही वाचा:

गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या

‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू

पंतप्रधान सुरक्षा दिरंगाईप्रकरणातील माजी न्या. इंदू मल्होत्रांना धमकी

‘मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या कदिस जिल्ह्यामध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. याआधी शुक्रवारी पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मात्र, सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नव्हती. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यापासून जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या अधिकारांवर, हक्कांवर तालिबानने गदा आणली आहे. महागाई, बेरोजगारी, गरिबी अशा संकटांचा सामना करत असतानाच त्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version