२६/११ चा आरोपी तहव्वुर राणा लवकरच भारताच्या ताब्यात?

२६/११ चा आरोपी तहव्वुर राणा लवकरच भारताच्या ताब्यात?

२६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याला भारताकडे सोपवण्याची विनंती अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारने अमेरिकेतील कोर्टाला केली आहे. तहव्वुर राणा हा २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील एक आरोपी आहे. राणा हा मूळ पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे.

अमेरिकेतील सह अधिवक्ता जॉन एल. जुलिअन यांनी लॉस अँजेलिस मधील कोर्टात असे सांगितले की, तहव्वुर राणाच्या केसमध्ये प्रत्यार्पणाचे सर्व मापदंड हे जुळत आहेत, त्यामुळे राणाचे प्रत्यार्पण करण्यात यावे. ४ फेब्रुवारी रोजी राणाच्या वकिलाने या प्रत्यार्पणाला विरोध दर्शवला होता. ५९ वर्षीय राणा हा २००८ मुंबई हल्ल्याच्या केसमध्ये आता भारताकडे सोपवला जाऊ शकतो अशी आशा आहे.

हे ही वाचा:

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन

मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर

वाझे ठरतोय लादेन मार्गी

२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी डेविड कोलमन हेडली हा तहव्वुर राणाचा बालमित्र. या हल्ल्यामध्ये १६६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते ज्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला अतिरेकी म्हणजे अजमल कसाब. पाकिस्तानचा नागरिक असलेला हा अजमल कसाब त्याचे नऊ पाकिस्तानी सहकारी दहशतवादी घेऊन भारतात आला होता. मुंबई सीएसटी, लिओपोल्ड कॅफे, ओबेरॉय हॉटेल, ताज हॉटेल आणि कामा हॉस्पिटल सारख्या महत्वाच्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत अनेक निष्पापांचा जीव घेतला होता.

Exit mobile version