23 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरदेश दुनिया२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं असलं तरी तेथे दुसरी एक दहशतवादी संघटनाही अस्तित्वात आहे जिने नुकतीच अमेरिकेचीही डोकेदुखी वाढवली होती. ही संघटना म्हणजे आयएसआयएस. अफगाणिस्तानमधील गट स्वतःला इसिस-के असं म्हणतोय. यात भारताचे २५ नागरिक सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय. भारतीय गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे इसिसमधील या भारतीय नागरिकांना भारतात पाठवण्याचेही प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.

भारतीय नागरिक असलेले इसिसचे हे २५ सदस्य अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतात असण्याची शक्यता आहे. नुकतेच अफगाण तुरुंगातून सोडण्यात आलेल्या कैद्यांमध्ये इसिस-के च्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशीही माहिती भारतीय गुप्तचर संस्थेला मिळालीय. यातीलच २५ जण काही वर्षांपूर्वीच इसिसमध्ये सहभागी झालेले भारतीय नागरिक आहेत. हे सर्व लोक तुरुंगात बंद होते, मात्र नुकतेच त्यांना सोडून देण्यात आले आहे. इसिस या सर्व लोकांचा उपयोग भारताविरोधात करण्याची शक्यताही आहे. या सर्वांना इसिसने पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डरवर कॉम्बॅट ट्रेनिंग देखील दिलंय.

इसिसमधील या सर्वांना मुंसिब नावाच्या एका आयएसआयएस दहशतवाद्यानं भरती केलं होतं. तो इसिसच्या सोशल मीडियावर रिक्रूटमेंट सेलचं काम पाहतो. मुंसिब एक आयटी एक्सपर्ट आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. त्यानेच या तरुणांना शिक्षणाच्या निमित्ताने जाळ्यात अडकवलं आणि नंतर हळूहळू इसिसमध्ये सहभागी करुन घेतलं. आयएसआयएस आता या लोकांना भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे.

हे ही वाचा:

भाजपा नेते सुनील यादव कालवश

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी

दरम्यान, इसिसने अफगाणमध्ये धुमाकूळ घातलाय. इसिसने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १६९ अफगाण नागरिक आणि १३ अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतही इसिसने पुन्हा काबुल विमानतळावर हल्ला केला. यानंतर अमेरिकेने ड्रोन हल्ले करत विमानतळावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा खात्मा केला. तसेच इतर ठिकाणी देखील अमेरिकन सैन्याने कारवाई केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून आयसिसने ३० ऑगस्टला पुन्हा ५ रॉकेट डागत हल्ला केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा