दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जण दगावले

दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जण दगावले

नाशिकला ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे २९ करोना रुग्णांना मृत्युमुखी पडावे लागल्याची हृदयद्रावक घटना ताजी असताना दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जणांना जीव गमवावा लागल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकूणच प्रशासन, सरकार यांच्या दिरंगाईचे आणखी एक उदाहरण या घटनेमुळे समोर आले आहे.

हे ही वाचा:

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

विरारच्या विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये अग्नितांडव

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये गेल्या २४ तासात २५ रुग्ण ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे बळी पडले आहेत. सकाळी ८ वाजता या हॉस्पिटल प्रशासनाने जाहीर केले की, केवळ २ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे आणि ६० रुग्ण हे त्यामुळे धोकादायक परिस्थितीत आहेत. गंगाराम हॉस्पिटलचे संचालक म्हणाले की, ताबडतोब यावर तोडगा निघायला हवा. ऑक्सिजनचा हवाई मार्गाने पुरवठा तातडीने केला जायला हवा. दोन तासांनी ऑक्सिजनचा टँकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचेही जाहीर करण्यात आले.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले आहेत की नाहीत यावरून वाद घातला. त्यातून त्यांचे बेजबाबदार वर्तन समोर आले. संचालक सतेंद्र काटोच म्हणाले की, ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे या रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कारण अतिदक्षता विभागातील रुग्णांना उच्च दाबाच्या ऑक्सिजनची गरज असते. पण हॉस्पिटलचे चेअरमन म्हणाले की,गेल्या २४ तासांत अनेक रुग्ण दगावले आहेत हे खरे पण ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडले आहेत, असे म्हणता येणार नाही.

Exit mobile version