नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात शुक्रवारी झाला. या दुर्घटनेत २४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. हे पर्यटक महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले असून या वृत्ताने राज्यात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात नर्स्यांगडी अंबुखैरनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळल्याची घटना घडली. नेपाळमध्ये झालेल्या भीषण बस दुर्घटनेतील मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रहिवाशांचा समावेश आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या अपघातातील मृतदेह वायुसेनेच्या विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील प्रवासी यात्रेकरूंच्या बसला उत्तर प्रदेशातून नेपाळकडे जाताना झालेल्या अपघाताचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाला असून काही भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळ दूतावास व उत्तर प्रदेश सरकारच्या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2024
नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी नेपाळ दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आज हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती?, एकानेच केला दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
महाराष्ट्र बंद मागे; पवारांच्या ट्विटने ठाकरेंची हवाच काढली !
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब हल हसनवर हत्येचा गुन्हा
महाराष्ट्रातील काही भाविकांनी चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या तीन बस बुक केल्या होत्या. माहितीनुसार, जवळपास ११० लोकांना घेऊन तीन बस प्रवास करत होत्या. यापैकी एका बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील ४० ते ५० भाविक होते. या दुर्घटनेनंतर नेपाळमधील जवानांच्या मदत पथकाने तातडीने मदतकार्य सुरु केले.