बुधवारी सेंट्रल पॅरिसमधील ऐतिहासिक परिसरातीमधील एका इमारतीमध्ये स्फोट होऊन २४ जण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या स्फोटानंतर मोठी आग लागली. त्यामुळे जवळची फॅशन स्कूल असलेली इमारत कोसळली, असे आपत्कालीन सेवेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीने रौद्र रूप धारण केले होते. ही आग इतकी मोठी होती की सुमारे ७० अग्निशमनच्या गाड्या आणि २३० जवान संध्याकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी झुंज देत होते. घटनास्थळी नऊ डॉक्टरही तैनात होते. स्फोट होऊन दोन इमारती कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू
कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी
पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा
…आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ
स्फोटीची तीव्रता इतकी अधिक होती की त्यामुळे ४०० मीटर दूर दूर असलेल्या इमारतींच्या खिडक्या तुटल्या. स्फोटानंतर लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले आहे, अशी माहिती पॅरिसचे पोलिस प्रमुख लॉरेंट न्युनेझ यांनी दिली. कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आणखी काही व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या स्फोटाच्या दणक्यामुळे तसेच या इमारतीला लागलेली आग पसरू नये, यासाठी शेजारील दोन इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या, असेही न्युनेझ यांनी सांगितले.