इस्रायलचा गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला, २४ ठार!

पॅलेस्टिनी माध्यमांनी दिली माहिती

इस्रायलचा गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला, २४ ठार!

इस्रायलने रविवारी पहाटे (६ ऑक्टोबर) गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात २४ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच डझनहून अधिक जण जखमी देखील झाल्याची माहिती आहे. पॅलेस्टिनी वृत्तसंस्था वाफाने ही माहिती दिली. मशिदीमध्ये हमासाचे कमांड सेंटर असल्याचा दावा, इस्रायलने केला आहे.

मध्य गाझा पट्टीतील देर अल-बालाह येथील अल-अक्सा रुग्णालयाजवळील मशिदीवर हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मशिदीचा वापर विस्थापितांना राहण्यासाठी केला जात होता, त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यात आहे.

हे ही वाचा : 

स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई!

दुर्गेचे चौथे रूप ‘कुष्मांडा’ – दधाना हस्त पद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तुमे

महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा

चमत्कार… यासिन मलिक झाला गांधीभक्त, शिवभक्त झाले राहुल गांधी

इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, हमासच्या दहशतवाद्यांवर अचूक हल्ला केला गेला, जे देर अल बालाह भागात असलेल्या ‘शुहादा अल-अक्सा’ मशिदीच्या नावाखाली काम करत होते, याच्या आतमध्ये हमासाचे कमांड सेंटर आणि नियंत्रण केंद्र चालवण्यात येत होते. दरम्यान, ७ ऑक्टोबर  २०२३ रोजी सुरु झालेल्या युद्धाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. गाझा आणि इस्रायलमधील तणाव वाढत आहे. या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version