चहा प्रेमींसाठी आला सोन्याचा चहा!

चहा प्रेमींसाठी आला सोन्याचा चहा!

चहा प्रेमींसाठी आनंदाची बातमी! दुबईतील सोन्याचा चहा अनेकांनी ऐकला असेल, पण आता सोन्याचा चहा पिण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. कारण आपल्या देशात आता या सोन्याच्या चहाची निर्मिती झाली आहे. आसाममधील चहाचे व्यापारी रणजीत बरुआ यांनी २४ कॅरेट सोन्याचा चहा तयार केला आहे. हा चहा सर्वांना नक्कीच भुरळ घालेल, असा विश्वास बरुआ यांनी व्यक्त केला आहे. मात्र या चहासाठी प्रति किलो अडीच लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

‘स्वर्ण पोनम’ हा चहा पूर्णपणे शुद्ध आहे. हा चहा खास बनवला आहे, त्यात २४ कॅरेट खाण्यायोग्य सोन्याच्या बारीक पाकळ्या आहेत. हे हनी टी क्लोनसह काळ्या चहाच्या सर्वोत्तम पानांपासून बनवला आहे. आसाममधील या दुर्मिळ काळ्या चहामध्ये मध, गूळ आणि कोको मिसळले आहे. आसामचे मास्टर टी मेकर रणजीत बरुआ यांनी हा खास चहा बनवला आहे. आसाममध्ये चहाच्या व्यवसायात त्यांची ओळख आहे. युरोपमध्येही ते चहा विकून प्रसिद्धीच्या झोतात आले. भारतातील हा ‘गोल्ड टी’ सर्वांना नक्कीच आकर्षित करेल, असा विश्वास बरुआ यांनी व्यक्त केलाय.

बरुआ यांनी अशी माहिती दिली की, हा चहा बनवण्यासाठी फ्रान्समधून पिण्यायोग्य सोन्याच्या पाकळ्या मागवल्या आहेत. तसेच या ब्रॅण्डसाठी उच्च गुणवत्तेचा पारंपारिक चहा वापरला आहे. चहा आणि सोन्याची आवड असलेल्या ग्राहक हे आमचे उद्दिष्ट असल्याचे बरुआ म्हणाले. ते म्हणाले, उत्पादन सुरु होण्यापूर्वीच या चहासाठी १२ ऑर्डर मिळाल्या होत्या, ज्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले. आम्ही लवकरच त्याची निर्यात सुरू करू,’ असे बरुआ यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

ज्ञानवापी मशीद प्रकरणी उद्या न्यायालय देणार निकाल

संजय राऊतांवर मेधा सोमय्यांचा १०० कोटींचा दावा

अफगाणिस्तानात महिला टीव्ही अँकरचे ‘चेहरे’ गायब

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

हा सोन्याचा चहा भारतातील एकमेव चहा असणार आहे. २१ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिनी’ हे अनोखे उत्पादन बाजारात दाखल करण्यात आले आहे. १०० ग्राम चहाची किंमत २५ हजार रुपये आहे म्हणजेच प्रति किलो त्याची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे.

Exit mobile version