… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’

… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, २०२१ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सोमवार, ४ एप्रिल रोजी २२ यूट्यूब वृत्तवाहिन्या, तीन ट्वीटर खाती, एक फेसबुक खाते आणि एक बातम्यांवर आधारीत संकेतस्थळ ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. या संकेतस्थळांवर, वृत्तवाहिन्यांवर भारताविषयी चुकीची माहिती पसरवली जात होती.

या ब्लॉक केलेल्या २२ वाहिन्यांच्या दर्शकांची एकत्रित संख्या २६० कोटींहून अधिक होती. या वाहिन्यांचा वापर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील विषयांवर फेक न्यूज आणि सामाजिक माध्यमांवर समन्वितपणे चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात होता.

हे ही वाचा:

मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर…

…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची

अनेक यूट्यूब वाहिन्यांच्या माध्यमातून भारतीय सैन्य, जम्मू-काश्मिरमधील विषयांवर चुकीच्या बातम्या पोस्ट करण्यात येत होत्या. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतविरोधी मजकूर पोस्ट केला जात होता. त्यासाठी पाकिस्तानमधील काही वाहिन्यांची मदत घेतली जात होती, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. तसंच युक्रेनमधील सध्यस्थितीवर या भारतीय यूट्यूब चॅनेल्सद्वारे मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असल्याचेही समोर आले आहे.

Exit mobile version