इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या युद्धाची भीषणता अधिक वाढताना दिसत आहे. दोन्ही बाजूने हल्ले सुरू असताना गाझामध्ये हमाससोबत झालेल्या लढाईत इस्रायलचे २० हून अधिक सैनिक मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. लढाई दरम्यान एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे काही सैनिक जखमी झाले आणि काही मारले गेले.
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे २१ सैनिक मारले गेले आहेत. लढाई सुरू असताना एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे काही सैनिक जखमी झाले. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यामध्ये दोन इमारतीही उध्वस्त झाल्या आहेत. त्याच वेळी इस्रायली सैन्याच्या टँकवर हमासच्या सैनिकांनी आरपीजीसह हल्ला केला. या सैनिकांच्या मृत्यूनंतर हमाससोबतच्या लढाईत आतापर्यंत इस्रायली लष्कराचे २०० हून अधिक सैनिक मारले गेले आहेत.
सध्या इस्त्रायली लष्कर स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या इमारतीमध्ये स्फोट झाला त्या इमारतीत मोठ्या प्रमाणात स्फोटके ठेवण्यात आल्याची माहिती आहे. इस्रायलचे सैनिक तेथे असताना इमारतीवर आरपीजी हल्ला करण्यात आला, त्यामुळे इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे दोन इमारती उद्ध्वस्त झाल्या. त्याचबरोबर स्फोटांमध्ये सैनिकांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा
शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या
कोट्यवधींच्या सुवर्णदागिन्यांनी सजला रामलल्ला!
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ऍडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, “या घटनेत एकूण २१ सैनिक मारले गेले. सीमेवर सुमारे ६०० मीटर परिसरात सैनिक तैनात होते. तेथील सैनिक हमासच्या ठिकाणांना उध्वस्त करत होते. दहशतवाद्यांनी आरपीजीने हल्ला केला. दरम्यान, दोन मजली इमारतींमध्ये स्फोट झाला. त्यानंतर इमारती कोसळल्या. या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून जवानांचा मृत्यू झाला.”