एका दिवसात २१ भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेकडून घरी पाठवले

हे विद्यार्थी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत

एका दिवसात २१ भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेकडून घरी पाठवले

अमेरिकेने एका दिवसात तब्बल २१ भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेतून परत पाठवणी केली आहे. व्हिजामध्ये फेरफार आणि योग्य कागदपत्रांअभावी असे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांनी मात्र सर्व कागदपत्रे योग्य असून कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरच ते अमेरिकेला जात होते, असा दावा केला आहे.

 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे विद्यार्थी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत. त्यांनी व्हिसाचे सोपस्कार पूर्ण केले होते. मात्र अटलांटा, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर कागदपत्रांची छाननी करताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेतील कॉलेजांनी प्रवेश दिल्यानेच तेथे जात होतो, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांच्या व्हॉट्स ऍप चॅटचीही तपासणी करण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

हे ही वाचा:

पालघर जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हबीब शेख याना अटक !

राहुल गांधींना स्मृती इराणी म्हणाल्या… ‘ते तर पक्षाचे मालक, मी माझ्या पक्षाची कार्यकर्ती’

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क !

समान नागरी कायद्यातील ही एक दुर्लक्षित घटनात्मक तरतूद

या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांनी काहीही न बोलता परत जाण्यास सांगितले. तसेच, याबाबत आवाज उठवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

 

 

या विद्यार्थ्यांपैकी काहींना मिसौरी आणि डकोटा येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला होता. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना एका खोलीत ठेवण्यात आले. तेथे कोणतीच संपर्काची साधने नव्हती. त्यांच्या कागदपत्रांत खरोखरच काही फेरफार आढळले असतील, तर या विद्यार्थ्यांना पाच वर्षांपर्यंत अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली जाऊ शकते. अमेरिका किंवा भारत दोन्ही देशांनी या संदर्भात कोणतेही निवेदन जाहीर केलेले नाही. ही घटना १२ ते १६ ऑगस्टदरम्यान घडली आहे.

Exit mobile version