श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेल्या २१ भारतीय मच्छिमारांना मायदेशात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून ते सुखरूप घरी परतत असल्याची माहिती कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली आहे. सोमवारी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करताना, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, “श्रीलंकेतून २१ भारतीय मच्छिमारांच्या गटाला यशस्वीरित्या परत आणण्यात आले आहे. ते सध्या घरी परतण्याच्या मार्गावर आहेत.”
यापूर्वी ८ डिसेंबर रोजी श्रीलंकेच्या नौदलाने रामनाथपुरमच्या किनाऱ्याजवळ आठ भारतीय मच्छिमारांना पकडले होते आणि दोन बोटी ताब्यात घेतल्या होत्या. रामानाथपुरममधील अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांची नावे मंगडू भत्रप्पन (वय ५५ वर्षे), रेडदयुरानी, कन्नन (वय ५२ वर्षे), चिन्ना रेडदयुरानी मुथुराज (वय ५५ वर्षे), अगस्तियार कुटम काली (वय ५० वर्षे) आणि थंगाचीमाड यासीन (वय ४६ वर्षे), येशू, उचिपुल्ली रामकृष्णन आणि वेलुलु अशी आहेत. त्यांना कांगेसंतुराई नौदल छावणीत नेण्यात आले होते.
मंडपम मच्छिमार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पकडलेले मच्छिमार मंडपम येथून समुद्रात गेले होते. मच्छिमारांनी सीमा ओलांडल्याचा दावा करत श्रीलंकेचे नौदल त्या भागात आले तेव्हा ते पाल्क बे समुद्र परिसरात मासेमारी करत होते. ७ डिसेंबर रोजी रामनाथपुरम जिल्ह्याच्या मंडपम उत्तर किनाऱ्यावरून बोटीतून समुद्रात गेलेले मच्छिमार श्रीलंकेचे नौदल या भागात पोचले तेव्हा ते पाल्क बे समुद्र परिसरातील डेल्फ्ट बेटावर मासेमारी करत होते. त्यांनी दोन बोटीही ताब्यात घेतल्या.
श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांची केलेली अटक तामिळनाडू सरकार तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या संदर्भात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यापूर्वी म्हटले होते की मच्छिमारांना ताब्यात घेणे आणि त्यांच्या बोटी जप्त केल्यामुळे किनारपट्टीवरील समुदायांमध्ये गंभीर त्रास आणि अनिश्चितता आहे. वारंवार पुनरुच्चार केला आहे की, या गंभीर समस्येचे मुत्सद्दीपणे निराकरण करण्यासाठी ठोस आणि सक्रिय पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
नागरी हक्कांसाठी सहाय्यक ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय-अमेरिकन हरमीत धिल्लन कोण आहेत?
माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांचे निधन
‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?
‘हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत चिंतेत’
त्यांच्या एका पत्राला उत्तर देताना जयशंकर यांनी त्यांना या विषयावर सक्रिय कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि ते म्हणाले की कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्त आणि अटक केलेल्यांची लवकर सुटका करण्यासाठी जाफना येथील वाणिज्य दूतावास वेगाने आणि सातत्याने अशी प्रकरणे हाती घेत आहे.