23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियादिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

तीनही दलांचे उत्कृष्ट प्रदर्शन

Google News Follow

Related

देशभरात ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे. अशातच दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेड आणि पथसंचलन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी कर्तव्यपथावर संचलनात आपला सहभाग दर्शवत दिमाखदार संचलन केलेआहे.कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथात सांस्कृतिक सामर्थ्याचं दर्शन झाले.

दरवर्षी भारताच्या सैन्य शक्तीचे दर्शन घडत असते. यामध्ये मेक इन इंडिया शस्त्रास्त्र, मिसाईल्स, रडार्स यांचाही समावेश असतो . यावेळी पुरूषांसह नारी शक्तीचेही प्र दर्शन कर्तव्य पथावर बघायला मिळाले. तर भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ देखील कर्तव्य पथावर बघायला मिळाले. या चित्ररथांच्या माध्यमातून देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि सशक्त सुरक्षेचे दर्शन देखील यावेळेस दिसून आले. कर्तव्य पथावर एकूण २३ चित्ररथ असून त्यात त्यामध्ये राज्यासह केंद्रशासित प्रदेशांचे १७ चित्ररथ आणि इतर मंत्रालय आणि विभागा चे ६ चित्ररथांचा सहभाग होता . महाराष्ट्राचा – ‘साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ होता तर .केरळचा चित्ररथ – नारी शक्ती आणि महिलांच सशक्तीकरणाची लोकपरंपरा दाखवणारा देखावा होता.

महाराष्ट्राचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
कर्तव्यपथावर महा राष्ट्र राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे’ हा विषय होता.अंबाबाईच्या नावानं उदो उदोचा गजर रथासमोर चालू होता आणि चित्ररथाच्या समोर गोंधळी होते.गोंधळींचं असलेले प्रमुख वाद्य संबळ या ठिकाणी दाखवलेलं होते. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा यावेळी दाखवण्यात आला होता.ही सगळी शक्तीपिठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे. याशिव पोतराजसुद्धा चित्ररथाच्या मध्यभागी दाखवला होता.महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले असून पाटणबोरी येथील यशवंत एकनाथ येणगुटीवार यांनी तयार केले होते.

हे ही वाचा:

बागेश्वर बाबांना नागपूर पोलिसांची क्लीन चीट

बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

बॉक्सिंग फेडरेशनने निलंबित केलेले असतानाही जय कवळी ऑलिम्पिक संघटनेत कार्यरत कसे?

प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जगाने दिल्लीतील कर्तव्यपथवर भारताचे लष्करी सामर्थ्य आज बघायला मिळाले आणि त्यासोबतच स्त्रीशक्तीही आपण बघितली.लेफ्टनंट चेतना शर्मा यांनी परेडमध्ये भारतात बनवलेल्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रदर्शनाचे नेतृत्व केले. परेड दरम्यान ‘चेतना शर्मा’ आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे नेतृत्व करत बाहेर पडताच संपूर्ण कर्तव्यपथ टाळ्यांच्या गजरात दुमदुमला.

चेतना शर्मा या एअर डिफेन्स रेजिमेंटमधील अधिकारी
लेफ्टनंट चेतना शर्मा या एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये लष्करी अधिकारी आहेत. देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ड्रोन आणि शत्रूच्या विमानांपासून आकाशाचे संरक्षण करणे हे एअर डिफेन्स रेजिमेंटचे काम असते.

यावेळच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडी कर्तव्यपथवर कूच करत असताना शौर्य आणि शिस्तीचे भव्य दर्शन घडले. कर्तव्यपथचे नाव बदलल्यानंतर ही पहिलीच परेड होती. पूर्वी याचे नाव राजपथ होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्तव्याच्या कर्तव्यपथवर राष्ट्रध्वज फडकवला. यानंतर राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा