पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला. जवळपास ७० % पाकिस्तान पुराच्या पाण्याने वेढल्या गेले हाेते. या पुरामुळे १५ अब्ज ते २० अब्ज डाॅलरचा आर्थिक फटका पाकिस्तानला बसल्याचं म्हटल्या जात आहे. इतकेच नाही तर पुरामुळे होणारे हे आर्थिक नुकसान १.२ लाख लोकांना दारिद्र्यरेषेखाली ढकलण्याची भीती सरकारला वाटत आहे. या नुकसानीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला तातडीने मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे.
पाकिस्तानचे वित्त मंत्रालय पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचे सध्या मूल्यांकन करत आहे. पुराचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. त्यानुसार सुरुवातीला पुरामुळे १० ते १२ अब्ज डाॅलरच्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. परंतु त्या तुलनेत हे नुकसान या अंदाजापेक्षा खूप जास्त असल्याची माहिती एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिली आहे.
पाकिस्तानमधील पुरामुळे झालेले आर्थिक नुकसान १५ अब्ज ते २० अब्ज डॉलरच्या दरम्यान असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. पुरामुळे देशातील मोठी लोकसंख्या प्रभावित झाली आहे. या पुरामुळे अर्थव्यवस्थेचे १२अब्ज डॉलर्सचे थेट नुकसान झाले आहे, त्यापैकी केवळ लोकांची घरे या पुरात उद्ध्वस्त झाल्याने ६ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.
हे ही वाचा:
चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे
वणीच्या सप्तशृंगी मातेचे का दिसते आहे हे वेगळे रूप?
राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा
याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?
अर्थमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आर्थिक नुकसानीचा बहुतांश अंदाज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ५ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीवर आधारित आहेत. त्यात बदल हाेऊ शकताे. पण नव्या अंदाजानुसार हे नुकसान १५ अब्ज ते २० अब्ज डॉलरच्या दरम्यान आहे.