बांगलादेशात आंदोलकांकडून अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या

आवामी लीग पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरात, दुकानांमध्ये केली जातेय तोडफोड

बांगलादेशात आंदोलकांकडून अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून उसळलेला हिंसाचार शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही आंदोलक शांत बसलेले नाहीत. आंदोलकांकडून हसीना शेख यांच्या आवामी लीग पार्टीच्या नेत्यांना आणि अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, हसीना यांच्या अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आंदोलन पेटल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या. पण, दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आंदोलकांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवामी लीगच्या २० नेत्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. आवामी लीग पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरात, दुकानांमध्ये तोडफोड केली जात आहे.

नाटोर-२ मतदारसंघाचे खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने लावलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी जन्नती पॅलेस नावाच्या खासदारांच्या घराच्या अनेक खोल्या, बाल्कनी आणि छतावरही मृतदेह आढळून आले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यांनुसार शेख हसीना यांच्या राजीनाम्याची बातमी समजल्यानंतर संतप्त जमावाने शफीकुल यांच्या घराला आग लावली.

दरम्यान, बांगलादेशचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका एयरपोर्टवरुन ताब्यात घेण्यात आलं. ते भारतात येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अटक झाली. अवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते परिवहन मंत्री अब्दुल क्वादर रविवारी रात्रीच देशाबाहेर निघून गेले. तर मंत्री राहिलेले अनिसुल हक देशसोडून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा..

डॉ. दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?

ट्रम्प यांच्या हत्येच्या कटामागे इराणशी संबंधित पाकिस्तानी व्यक्ती?

निवडणुकीत उतरले किंवा नाही तरी जरांगेंचा स्पर्धक ठरलाय?

देशाच्या २७ जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले झाले आहेत. तर, सुरक्षा यंत्रणांनाही लक्ष्य करण्यात येत आहे याचं पार्श्वभूमीवर बांगलादेश पोलिस सर्विस असोसिएशनने (BPSA) मंगळवारी संपाची घोषणा केली. जो पर्यंत पोलिसांची सुरक्षा निश्चित होत नाही, तो पर्यंत संपावर आहोत, असं स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. सोमवारी बांगलादेशात ४०० हून अधिक पोलीस ठाण्यांवर हल्ला झाला. यामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला.

Exit mobile version