भारताची राजधानी दिल्ली येथून ९० कोटींचे ड्रग्स पकडण्यात आले आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्वानाने दाखवलेल्या सजगतेमुळे ही ड्रग्स तस्करी पकडली गेली आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १२.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. तर या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. हे हेरॉईन केनियातील नैरोबी येथून अबू धाबी मार्गे भारतात आणले गेले. युगांडाच्या नागरिक असलेल्या दोन महिलांकडून ही ड्रग्सची तस्करी केली जात होती. या ड्रग्सचे बाजार मूल्य तब्बल ९० कोटी इतके आहे.
हे ही वाचा:
तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाच्या श्वान पथकातील एका श्वानाने या महिलांच्या सुटकेसमध्ये ड्रग्स असल्याचे हुंगले. तो या सुटकेसकडे पाहून भुंकू लागला. त्यामुळे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही काहीतरी काळेबेरे असल्याचे समजले. त्यांनी या बॅगेची तपासणी सुरू केली आणि महिला प्रवाशांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा या महिला प्रवाशांनी त्यांच्या बागेत हेरॉईन असल्याचे मान्य केले. त्यांनी आपल्या बॅगेमध्ये ड्रग्स लपवण्यासाठी एक विशेष चोर कप्पा तयार करून घेतला होता. या चोर कप्प्यात ड्रग्स लपवून तस्करी केली जात होती. यापैकी एका महिलेच्या बागेत ५.४ किलो हेरॉईन सापडले. तर दुसऱ्या महिलेकडून ७.५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.