बांगलादेशमध्ये अराजकता पसरली असून शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे. अशातच बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयातून काही कर्मचाऱ्यांना माघारी आणण्यात आले आहे. एका विशेष एअर इंडिया (AI1128) फ्लाइटने भारतीय उच्चायुक्तालयातील १९० आवश्यक नसलेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना परत आणण्यात आले आहे.
ढाका येथील उच्चायुक्तालयात सुमारे २० ते ३० वरिष्ठ कर्मचारी शिल्लक आहेत, अशी माहिती ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. ढाका येथील उच्चायुक्तांव्यतिरिक्त, भारताचे चितगाव, राजशाही, खुलना आणि सिल्हेत येथे सहायक उच्चायुक्त किंवा वाणिज्य दूतावास आहेत. भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने माघारी पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा..
बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !
बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !
“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन
बांगलादेशात संतप्त जमावाने प्रसिद्ध अभिनेत्यासह वडिलांची मारहाण करत केली हत्या !
मंगळवारी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, सध्या बांगलादेशात सुमारे १० हजार भारतीय आहेत. बांगलादेशातील परिस्थिती अजूनही बदलत असून आम्ही आमच्या राजनैतिक समुदायाद्वारे बांगलादेशातील भारतीयांशी सतत संपर्कात आहोत,” जयशंकर संसदेत म्हणाले. तसेच सर्वपक्षीय बैठकीदरम्यान संसदेतील खासदारांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशातील परिस्थिती इतकी चिंताजनक नाही की हिंसाचारग्रस्त देशातील १० हजार भारतीयांना बाहेर काढावे लागेल.