चीनचे संरक्षण मंत्री भारतातील एससीओ बैठकीत लावणार हजेरी !

पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये तीन वर्षांच्या संघर्षानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट असेल.

चीनचे संरक्षण मंत्री भारतातील एससीओ बैठकीत लावणार हजेरी !

मागील काही दिवसात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या सर्वोच्च कमांडरना चीनसोबतच्या नियंत्रण रेषेवर (LAC) कडक नजर ठेवण्यास सांगितले होते .त्यामुळे उत्तरेकडील लडाख क्षेत्रातील परिस्तिथी तणावपूर्ण राहिली होती.एलएसी (LAC) म्हणजे ‘लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल’ ही एक काल्पनिक सीमारेखा आहे.जी भारत-नियंत्रित प्रदेश चीन-भारत सीमेवरील चिनी-नियंत्रित प्रदेशापासून वेगळे करते.

२७ आणि २८ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू या आठवड्यात भारताला भेट देणार आहेत, अशी घोषणा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी केली. पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये तीन वर्षांच्या संघर्षात बंदिस्त झाल्यानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट असणार आहे.

हे ही वाचा:

डबल-ढोलकीच्या तालावर…

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

निमंत्रण मिळाल्यावर, चीनचे स्टेट कौन्सिलर आणि संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू २७ ते २८ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली, भारत येथे SCO च्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील,” असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.”बैठकीदरम्यान, जनरल ली परिषदेला संबोधित करतील आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक परिस्थिती तसेच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांना भेटतील,” असे निवेदनात म्हटले आहे.

ली शांगफू तसेच रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु हे त्यांचे भारतीय समकक्ष राजनाथ सिंह यांच्याशी बैठकीच्या बाजूला द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.२०२० च्या सुरुवातीपासून भारत आणि चीन लडाख सेक्टरमध्ये जवळजवळ तीन वर्षांपासून वादात अडकले आहेत, द्विपक्षीय संबंध दशकांमध्‍ये बिघडले आहेत. दोन्ही बाजूंनी LAC वर हजारो सैन्य आणि मोठा शस्त्रसाठा तैनात केला आहे.जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे झालेल्या प्राणघातक चकमकीत दोन्हीकडील सैनिक ठार झाले – १९७५ नंतर एलएसीवरील पहिली मृत्यूची घटना आहे.

ली शांगफू यांची भेट आणि राजनाथ सिंग यांच्यासोबत संभाव्य द्विपक्षीय भेट ही दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी LAC वरील संघर्षावर तोडगा काढण्याची दुर्मिळ संधी असेल. या अगोदर चीनचे माजी संरक्षण मंत्री वेई फेंगे यांनी सप्टेंबर २०२० मध्ये मॉस्को येथे SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी सिंग यांची भेट घेतली होती. मात्र आतापर्यंत यावर काही तोडगा निघाला नाही.

Exit mobile version