अमेरिकेमधील टेक्सासमध्ये एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला असून यात विद्यार्थी आणि शिक्षक अशा २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गोळीबार करत असलेल्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे.
टेक्सासमधील रॉब एलिमेंटरी स्कुलमध्ये साल्वाडोर रामोस हा १८ वर्षीय हल्लेखोर मंगळवार, २४ मे रोजी दुपारच्या सुमारास शाळेत घुसला. त्यावेळी त्याच्याकडे बंदूक होती तसेच रायफल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर या तरुणाने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा आणि तीन प्रौढांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे विद्यार्थी दुसरी ते चौथीच्या वर्गातील होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गोळीबार करणाऱ्या तरुणाने शाळेत येण्यापूर्वी त्याच्या आजीची हत्या केली होती. मात्र, या दोन्ही घटनांचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत
हरियाणवी गायिकेची हत्या, दोघांना अटक
वराला टक्कल असल्याचे समजताच वधूने लग्न करण्यास दिला नकार
हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टेक्सासच्या गव्हर्नरशी संवाद साधून परिस्थिती समजून घेतली. बायडन यांनी राज्यपालांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितलं आहे. या घटनेचा शोक व्यक्त करताना व्हाईट हाऊसमध्ये आणि इतर सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला.