मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी महापौरासह १८ जणांचे घेतले बळी

भिंतीवर गोळ्यांचा वर्षाव झाल्याचे फोटो व्हायरल

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी महापौरासह १८ जणांचे घेतले बळी

अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १८ जणांची हत्या झाली आहे. या गोळीबारात मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे. संघटित गुन्हेगारीशी संबंधित बंदूकधाऱ्यांनी दक्षिण-पश्चिम मेक्सिकोतील सॅन मिगुएल टोटोलापन येथे सिटी हॉल आणि जवळच्या घरावर गोळीबार केल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. ज्यामध्ये सिटी हॉलच्या भिंतींवर शेकडो गोळ्या झाडल्याचे दिसत आहेत.

बुरखाधारी दाेन एसयुव्ही कारमधून आले. या सशस्त्र टाेळीने सॅन मिगुएल टोटोलापनचे महापौर आणि माजी महापौर कोनराडो मेंडोझा आणि त्याचे वडील जुआन मेंडोझा यांची हत्या केली आहे. अधिकाऱ्यांनी ओळखलेल्या दहा मृतदेहांमध्ये बहुतेक स्थानिक सरकारचे सदस्य होते, असे रिफॉर्मा वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. मृतांमध्ये इतर शहर पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फुटेजमध्ये किमान दहा लोकांचे मृतदेह एकमेकांच्या जवळ पडलेले दिसत आहे. राज्य ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने गोळीबारात १८ लोक ठार झाल्याचं म्हटलं आहे.

बंदूकधारी पळून गेले

हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले मात्र बंदूकधारी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. आता प्रत्येक कोपऱ्यात नाकाबंदी करून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप एकही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस याला सुनियोजित कट मानत आहेत.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

 लॉस टेकिलरोसने जबाबदारी स्वीकारली

लॉस टेकलेरोस या गुन्हेगारी गटाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुधवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, जरी स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्वरित पुष्टी झाली नाही. कोनराडो मेंडोझा यांच्या पीआरडी या राजकीय पक्षाने मेयरच्या मृत्यूची पुष्टी केली.

Exit mobile version